Breaking News

माणगावजवळ इनोव्हा-स्कॉर्पिओ ठोकर

प्रवासी महिलेचा मृत्यू; चार जखमी

माणगाव : प्रतिनिधी

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील माणगावजवळ कळमजे गावच्या हद्दीत रविवार (दि. 12) पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास इनोव्हा कार व स्कॉर्पिओ यांच्यात समोरासमोर जोरदार ठोकर झाली.

या अपघातात इनोव्हामधील महिलेचा मृत्यू झाला असून, चारजण जखमी झाले आहेत. त्यांना माणगाव उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चालक साजिद दळवी हे त्यांच्या ताब्यातील इनोव्हा कार (एमएच-06, एन-8989) घेऊन मुंबईकडून माणगावकडे होते. मुंबई-गोवा महामार्गावरुन त्यांची गाडी रविवार पहाटेच्या सुमारास माणगावजवळील कळमजे गावच्या हद्दीत आली असता, समोरून आलेल्या स्कॉर्पिओ जीप (एमएच-04, डीआर-1269) आणि इनोव्हा कारची समोरासमोर ठोकर झाली. या अपघातात इनोव्हामध्ये बसलेल्या फातीमा जैनूद्दीन दाते (वय 69, रा. करसाल दिघी, ता. श्रीवर्धन) यांचा मृत्यू झाला. तर इनोव्हा चालक साजिद दळवी (वय 40, रा. दिघी, ता. श्रीवर्धन), जैनूद्दीन इस्माईल दाते (वय 72), उमेमा अखिल दाते (वय 25, दोन्ही रा. करसाल दिघी, ता. श्रीवर्धन) आणि भावेश नरेंद्र राऊत (वय 28, रा. ऐरोली, नवी मुंबई) हे चारजण जखमी झाले. जखमींना जखमीना माणगाव उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची फिर्याद साजिद अ. समद दळवी यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली. अधिक तपास पोलीस नाईक सुनिल जाधव करीत आहेत.

Check Also

सीकेटी विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) …

Leave a Reply