Breaking News

पुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा

देशद्रोही पीएफआय कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

पुणे : प्रतिनिधी
राष्ट्रीय तपास एजन्सीने (एनआयए) केलेल्या कारवाईविरोधात गुरुवारी (दि.3) पुण्यात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेकडून आंदोलन करण्यात आले. या वेळी ’पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करणार्‍या पीएफआयच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर काही आंदोलनकांनी ’पाकिस्तान जिंदाबाद’, ‘नारा ए तकबीर, अल्लाह हूं अकबर’ अशा घोषणा दिल्या. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी पीएफआयचा कार्यकर्ता रियाज सय्यदसह 60 ते 70 कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply