अलिबाग : प्रतिनिधी
सेवा पंधरवडा अंतर्गत थळ विभाग भाजपतर्फे अलिबाग तालुक्यातील थळ समुद्र किनारी सुरू व इतर धुप प्रतिबंधक वृक्षांची लागवड करण्यात आली. भाजप सोशल मीडिया विधानसभा प्रमुख पंकज अंजारा आणि महिला मोर्चा तालुका सरचिटणीस जान्हवी पारीख-अंजारा यांच्या पुढाकारातून थळ समुद्र किनारी आयोजीत केलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमास स्थानिक ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भाजपचे अलिबाग तालुका अध्यक्ष परशुराम म्हात्रे, राज्य परिषद मंडळ सदस्य सतीश लेले, जिल्हा सचिव समीर राणे, तालुका सरचिटणीस संतोष पाटील, प्रशांत पाटील, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष आलाप मढवी, तालुका उपाध्यक्ष निखील चव्हाण, सरचिटणीस निखिल चव्हाण, चिटणीस राजेंद्र पेढवी, संदीप पवार, सुनील माने, रवी पाटील आदि पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाजप ओबिसी सेलचे रायगड जिल्हा अध्यक्ष जगदीश घरत, युवामोर्चा जिल्हा चिटणीस शैलेश नाईक, ज्येष्ठ नेते विकास काठे, संचालक लालू लट. सुदिन माळी यांनी विशेष मेहनत घेतली. समुद्र किनारी धुप प्रतिबंधक सुरू व इतर झाडांची लागवड केल्याबद्दल थळ ग्रामस्थांनी या भाजपचे आभार मानले.