खोपोली, खालापूर : प्रतिनिधी
खालापूर तालुक्यातील 44 ग्रामपंचायत सरपंच पदाची आरक्षण सोडत शुक्रवारी (दि. 22) तहसील कार्यालय परिसरात काढण्यात आली. यात तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण बदलल्याने दिग्गज राजकीय नेत्यांना धक्का बसला आहे. दरम्यान, सोडतीमध्ये पुन्हा काही पंचायतींना तेच आरक्षण आल्याने काहीकाळ गदारोळ झाला होता. या बाबतच्या प्रश्नांचे प्रांत अधिकारी वैशाली परदेशी यांनी निरसन केले.
या सोडतीमध्ये सरपंच पदाच्या आरक्षण बदलामुळे जिल्हा आणि तालुकास्तरावर राजकारण करणार्या दिग्गज नेत्यांना धक्का बसला आहे. या वेळी तहसीलदार इरेश चप्पलवार यांच्यासह राजकिय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
अनुसूचित जाती खुला प्रवर्ग ़: टेंबरी
अनुसूचित जाती महिला : नडोदे
अनुसूचित जमाती महिला : खानव, खरीवली, कुंभिवली, देवन्हावे, आत्करगाव,
अनुसूचित जमाती खुला प्रवर्ग : बीड खुर्द, वडगाव, इसांबे, नंदनपाडा, माणकीवली,
नागरिकांचा मागस प्रवर्ग : साजगाव, तुपगाव, हाल खुर्द, नावंडे, वडवळ, आसरे
ना म प्र महिला : आपटी, चिलठन, नारंगी, लोधिवली, माजगांव, होराळे
सर्वसाधारण : चांभार्ली, तांबटी, जांभिवली, शिरवली, गोरठण बुद्रुक, होणाड, वावंढळ, सावरोली, उंबरे, चावणी
सर्वसाधारण महिला : वासांबे, वावोशी, माडप, वावरले, वरोसे, कलोते, जांबरुंग, ठाणेन्हावे, चौक, बोरगाव खुर्द