भाजप नेते अरुणशेठ भगत यांचे विद्यार्थ्यांना आवाहन
गव्हाण विद्यालयात बारावी परीक्षेचे प्रवेशअर्ज भरण्यास प्रारंभ
पनवेल : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्यु. कॉलेजमधील इयत्ता बारावी बोर्ड परीक्षा 2023 या परीक्षेस प्रविष्ट होणार्या परिक्षार्थींचे आवेदनपत्र भरण्याचा शुभारंभ विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन व रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी व समन्वय समिती सदस्य अरुणशेठ भगत यांचे हस्ते करण्यात आला. अध्यक्षीय भाषणात अरुणशेठ भगत यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवून यशस्वी व्हावे व विद्यालयाच्या उज्ज्वल निकालाची यशस्वी परंपरा कायम राखावी, असे आवाहन केले.
या वेळी स्थानिक शाळा समितीचे ज्येष्ठ सदस्य अनंताशेठ ठाकूर, विश्वनाथ कोळी, ज्येष्ठ नेते जयवंतराव देशमुख, विद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या व रयत शिक्षण संस्थेच्या लाईफ वर्कर ज्योत्स्ना ठाकूर, रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर व समन्वय समिती सदस्यद्वय प्रमोद कोळी व रवींद्र भोईर, ज्युनियर कॉलेज विभागप्रमुख प्रा. बाबुलाल पाटोळे, प्रा. माणिकराव घरत, प्रा. राजू खेडकर, प्रा. उमेश पाटील, प्रा. जयवंती ठाकूर, प्रा. अर्चना पाटील व विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी व समन्वय समिती सदस्य अरुणशेठ भगत व अन्य मान्यवरांच्या हस्ते परीक्षार्थी विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात मिठाई भरवून व पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्युनियर कॉलेज विभाग प्रमुख प्रा. बाबुलाल पाटोळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. राजू खेडकर यांनी केले तर प्रा. उमेश पाटील यांनी आभार मानले.