पनवेल : रामप्रहर वृत्त
भाजपचे कळंबोली मंडळ अध्यक्ष तथा पनवेल महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती अमर अरुण पाटील यांचा वाढदिवस सोमवारी (दि.16) विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा झाला. यानिमित्त कळंबोलीमध्ये 3 ठिकाणी मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरांचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी अमर पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच त्यांनी राबवलेल्या या सामाजिक कार्यक्रमामुळे सर्वांना प्रेरणा मिळाली असल्याचे प्रतिपादन केले.
भारतीय जनता पक्षाचे कळंबोली मंडल अध्यक्ष अमर अरुण पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कळंबोलीतील सेक्टर 3 मधील सिटी हॉस्पिटल येथील रुग्णालयात जनरल चेकअप, कान, नाक, घसा, डोळे व दंतरोग तपासणी, सेक्टर 16 मधील आशा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जनरल चेकअप, कान, नाक, घसा, रक्तदाब, रक्त तपासणी, तसेच गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग तपासणी, तर सुश्रुत हॉस्पिटल येथे जनरल चेकअप, कान, नाक, घसा, आणि हाडांची तपासणी करण्याबरोबरच औषधे मोफत देण्यात आली. या शिबिरांना नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या वेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, भाजपचे ज्येष्ठ नेते अरुणशेठ भगत, माजी अध्यक्ष रविनाथ पाटील, माजी नगरसेवक बबन मुकादम, राजू शर्मा, रवी भगत, माजी नगरसेविका प्रमिला पाटील, मोनिका महानवर, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रिया मुकादम, भटके विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष बबन बारगजे, साऊथ सेल उपाध्यक्ष रमेश नायर, जिल्हा चिटणीस संदीप म्हात्रे, सरचिटणीस दिलीप बिष्ट, संजय दोडके, उपाध्यक्ष संदीप भगत, सुनील ढेबरे, जोहेब पटेल, ज्येष्ठ नेते गुरुनाथ ठाकूर, अमर ठाकूर, महिला अध्यक्ष मनीषा निकम, बैजा बारगजे, सरस्वती कथारा, शुभांगी निर्मले, सुनीता हिरवले, नीता अधिकारी, विजया कदम, उमा राव, युवा मोर्चा अध्यक्ष गौरव नाईक, निशांत गिल, केशव यादव, विष्णू गायकवाड, निलेश भोईर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.
Check Also
नांदगाव येथे भाजप महायुतीचा जोरदार प्रचार
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात …
RamPrahar – The Panvel Daily Paper