कर्जत : बातमीदार
सेवा आणि संस्कृती पंधरवडा अंतर्गत भाजप महिला मोर्चाच्या रायगड जिल्हा चिटणीस बिनीता घुमरे यांनी कर्जतमध्ये अन्नपूर्णा पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी संतोष भोईर यांनी अन्न पदार्थातील भेसळ कशी ओळखावी, याचे मार्गदर्शन केले. कर्जत शहर भाजप कार्यालयात घेतलेल्या या स्पर्धेला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला. अर्चना राजपूत, शर्मिला मराडे, आणि मनीषा माळी यांच्या पाककृतीला अनुक्रमे पहिल्या तीन क्रमांकाची बक्षिसे मिळाली. त्यांना सन्मानचिन्ह आणि भेटवस्तू देण्यात आल्या. स्पर्धेच्या परीक्षक म्हणून माणिक जाधव यांनी काम पाहिले. त्यांनी या वेळी महिलांनी खाद्य पदार्थ व्यवसाय कसा करावा, याबद्दल मार्गदर्शनही केले. भाजपचे तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, जिल्हा चिटणीस रमेश मुंढे, कर्जत तालुका सरचिटणीस संजय कराळे, कर्जत शहर अध्यक्ष नगरसेवक बळवंत घुमरे, महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस मृणाल खेडकर, कर्जत तालुका माजी अध्यक्षा सुगंधा भोसले, तालुका उपाध्यक्षा प्रीती तिवारी, महिला शहर अध्यक्षा सरस्वती चौधरी,तसेच तृषाली मुंढे, प्रतिभा बारणे, अंकिता तिवारी यांच्यासह महिला या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. पारंपरिक गरबा खेळून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.