Breaking News

उरण पालिकेकडून जनजागृती फलक

उरण : रामप्रहर वृत्त

कोरोना व्हायरसने देशात हाहाकार माजवला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून उरण नगरपालिकेने भर रस्त्यावर सूचना फलक लिहून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोनाने बाधीत रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस फुगत चालला आहे. तरीही जनता याचे गांभीर्य मनावर घेत नाही. यासाठी   ऐनकेन प्रकारे शासकीय प्रशासनाकडून जनजागृती करण्याचा प्रयत्न सुरू आहे. उरण नगरपालिकेने भर रस्त्यात म्हणजे उरण करंजा रस्त्यावरील पालवी हॉस्पिटल जवळ पेंटींगच्या साह्याने घरातच रहा सुरक्षित रहा! आपल्या घराभोवती असलेली स्वरक्षणांची लक्ष्मणरेषा ओलांडाची नाही. असा फलक बनवून जनतेमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. जनतेला अनेक प्रकारे समजवत गर्दी टाळण्यास सांगूनही व कामाशिवाय रस्त्यावर येण्यास जमावबंदी असतानाही याचे सर्रासपणे उल्लंघन त्यांच्याकडून होत आहे. त्यामुळे या जनजागृती फलकाचा किती परिणाम होतो हे लवकरच समजेल.

Check Also

उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात

उलवे नोड ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये …

Leave a Reply