Breaking News

चोरट्यांशी झटापट; चालत्या ट्रेनमधून महिला पडली

पनवेल : बातमीदार

दादरजवळ दिव्यांग महिलेला एक्स्प्रेसमधून ढकलून दिल्याची घटना ताजी असतानाच, आता तुतारी एक्स्प्रेसमध्येही चोरट्यांनी मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला असता महिलेचा तोल जाऊन एक्स्प्रेसमधून ती पडली. रविवारी ही घटना घडली. तिच्यावर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सुवर्णा महाडिक (वय 53) या तुतारी एक्स्प्रेसमधून (वैभववाडी-दादर) प्रवास करत होत्या. त्या दरवाजात उभ्या होत्या. त्याचवेळी चोरट्यानं त्यांच्या गळ्यातील सोन्याचं मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला. चोरट्याशी झालेल्या झटापटीत त्यांचा तोल गेला आणि त्या एक्स्प्रेसमधून खाली पडल्या.

सुवर्णा महाडिक यांच्या पतीने प्रसंगावधान राखून एक्स्प्रेसची साखळी खेचून थांबवली. तसेच पनवेल रेल्वे पोलिसांना याबाबत माहिती दिली. महाडिक या रेल्वे रुळांवर जखमी अवस्थेत पडल्या होत्या. रेल्वे पोलिसांनी त्यांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल केले.

Check Also

‘सीकेटी‘त इतिहास विभागाद्वारे आंतरराष्ट्रीय परिषद

विविध महाविद्यालये, विद्यापीठांतून 92 प्राध्यापक आणि संशोधकांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण …

Leave a Reply