मुरुड : प्रतिनिधी
मुरुड शहरातील जुना पाडा महादेव कोळी समाज मुरुड सिटी सर्वे नंबर 65़ ड 2 या कोळी लोकांचे बिन आकारी होळीचे मैदान असून येथे मुरुड नगरपरिषदेचे गटाराचे बांधकाम सुरु असतानाच काळ भैरव देवस्थान मंदिर ट्रस्ट भंडारी समाज मुरुड यांनी गटाराच्या मूळ बांधकामात अनधिकृतपणे लोखंडी खांब उभे केले आहेत. असे केल्याने मुरुड भंडारी समाजाने त्यांचा कोणताही संबंध नसताना आमच्या समाजाच्या होळीच्या ठिकाणाला सीमांकित करण्याचा प्रयत्न केला आहे. हा लोखंडी पोल तातडीने काढून टाकण्याची मागणी कोळी समाजाने केली होती. नगरपरिषदकडून कोणताच सकारत्मक प्रतिसाद न मिळाल्यामुळे अखेर नियोजित निवेदनाप्रमाणे बुधवारी (दि. 5)कोळी समाजाने असंख्य महिला व पुरुष यांच्यासोबत मुरुड नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर आंदोलन सुरु करण्यात आले.