नवी दिल्ली ः शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला आतापर्यंतचा सर्वांत मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे पक्षचिन्ह गोठविले आहे. एवढेच नव्हे; तर शिवसेना पक्षाचे नावदेखील त्यांना वापरता येणार नाही. दुसरीकडे मुख्यमंंत्री एकनाथ शिंदे गटासाठी ही जमेची बाब ठरणार आहे. शिवसेनेत उभी उभी फूट पडल्यानंतर पक्षाच्या धनुष्यबाण चिन्हावर शिंदे गटाने दावा केल्याने याबाबतची सुनावणी निवडणूक आयोगासमोर सुरू होती. या संघर्षावर शुक्रवारी झालेल्या सुनावणीत निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला 8 ऑक्टोबर दुपारी 2 वाजेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह आपली बाजू मांडण्याचा आदेश दिला होता, पण कागदपत्रांसाठी अजून चार आठवडे लागणार असल्याने तेवढी मुदत द्यावी, अशी विनंती ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे केली होती. निवडणूक आयोगाने अंधेरीची पोटनिवडणूक लक्षात घेऊन धनुष्यबाण चिन्ह गोठविले आहे.
Check Also
शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …