खारघर ः रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर महाविद्यालयातील वाणिज्य शाखेतील द्वितीय वर्षाचा विद्यार्थी उमेश पाटील याने मुंबई विद्यापीठांतर्गत खोपोली येथे घेण्यात आलेल्या आंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक मिळविले. संस्थेचे ध्येय हे समाजातील शोषित, वंचित घटकांना शिक्षण देणे व चांगले खेळाडू तयार करणे आहे. या अनुषंगाने येणार्या काळात महाविद्यालयातील विद्यार्थी चांगले खेळाडू होतील, अशी आशा प्राचार्य डॉ. रुपेंद्र गायकवाड यांनी व्यक्त केली. उमेश पाटीलला कुस्ती स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्राध्यापक, कोच यांचे प्रोत्साहन, मार्गदर्शन लाभले. संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे उपाध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, सचिव डॉ. एस. टी. गडदे यांनी उमेशचे कौतुक व अभिनंदन केले आणि पुढील स्पर्धांसाठी त्याला शुभेच्छा दिल्या.
Check Also
शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव
पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …