Breaking News

आमदार महेश बालदी यांच्या निधीतून रस्ते काँक्रीटीकरण

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त

पनवेल आणि उरण तालुक्यात भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली विकासपर्व सुरू आहे. त्या अंतर्गत गव्हाण ग्रामपंचायत हद्दीतील अंतर्गत रस्त्याचे आणि न्हावे ग्रामपंचायत हद्दीतील बोरण रस्त्याचे काँक्रीटीकरण महेश बालदी यांच्या आमदार निधीतून करण्यात येणार आहे. या विकासकामांचे भूमिपूजन रविवारी (दि. 9) भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाले. गव्हाण ग्रामपंचायत हद्दीतील वैभव देशमुख यांच्या घरापासून ते स्मशानभूमीपर्यंतच्या 400 मीटर रस्त्याचे आणि न्हावा येथे 190 मीटरच्या बोरण रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. या कामाचा रविवारी शुभारंभ झाला. या भूमिपूजन समारंभांना न्हावे ग्रामपंचायतीचे सरपंच हरिश्चंद्र म्हात्रे, गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, भाजप तालुका चिटणीस जयवंत देशमुख, चंद्रकांत भोईर, विश्वनाथ कोळी, हेमंत ठाकूर, गव्हाण ग्रामपंचायत सदस्य उषा देशमुख, योगिता भगत, कामिनी कोळी, तुषार भोईर, चंद्रकांत पाटील, दीपक भोईर, देवेंद्र भोईर, मीनाक्षी पाटील, मंजुषा ठाकूर, कल्पना घरत, विजया ठाकूर, रंजना घरत, सुशीला पाटील, मोरेश्वर पाटील, सुहास भगत, अशोक कडू, प्रमोद कोळी, कैलास कोळी, परशुराम वासकर, हिरालाल ठाकूर, स्नेहलता ठाकूर, पूर्वा वासकर, अनिता ठाकूर, रामनाथ तांडेल यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply