Breaking News

समग्र रायगड कॉफी टेबल बूकचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील उपयुक्त माहितीचे संकलन असलेल्या जिल्हाधिकारी समग्र रायगड पर्यटन, पर्यावरण, सक्षमीकरण या कॉफी टेबल बूकचे प्रकाशन सोमवारी (दि. 17) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात झाले.
रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या समग्र रायगड पर्यटन, पर्यावरण, सक्षमीकरण या कॉफी टेबल बूकमध्ये प्राचीन लेणी, गड किल्ले, समुद्रकिनारे, वॉटर स्पोर्ट्स, धरणे, बंदरे, धबधबे, गिरीस्थाने, अभयारण्य, ऐतिहासिक व धार्मिक ठिकाणे अशा पर्यटनस्थळांसोबतच उद्योग-कारखाने, स्थानिकांच्या सक्षमीकरणासाठी नाविन्यपूर्ण योजना, पर्यटकांसाठी मार्गदर्शक नकाशे अशा उपयुक्त माहितीचे संकलन करण्यात आले आहे.
प्रकाशन समारंभास राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत तसेच राज्याचे मुख्य सचिव मनूकुमार श्रीवास्तव, रायगड जिल्हाधिकारी तथा कोकण विभागीय प्रभारी आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कॉफी टेबल बूक तयार करण्यासाठी जिल्हा नियोजन अधिकारी जयसिंग मेहेत्रे, रायगड जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप व मीडिया आर अ‍ॅण्ड डीचे दिलीप कवळी यांचे विशेष सहकार्य लाभले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply