Breaking News

कामगार नेते जितेंद्र घरत यांच्या माध्यमातून दीपक नायट्रेडमधील कामगारांना पगारवाढीचा करार

दरमहा 13,500 रुपयांची पगारवाढ

पनवेल ः प्रतिनिधी

तळोजा एमआयडीसी क्षेत्रातील दीपक नायट्रेड लिमिटेडमधील कामगारांना वेतनवाढ आणि सेवा सुविधांचा करार दीपक नायट्रेड एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष कामगार नेते जितेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला. त्यानुसार कामगारांना प्रती महिना 13,500 रुपयांची पगारवाढ झाली आहे.

चार वर्षांसाठी झालेल्या करारानुसार पगारवाढीसोबत 20 टक्के बोनस, तीन लाख रुपयांची मेडिक्लेम पॉलिसी, 15,200  सानुग्रह अनुदान व इतर सेवा कामगारांना देण्यात येणार आहेत. या करारावर स्वाक्षरी करताना युनियनचे अध्यक्ष जितेंद्र घरत, जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या कार्यालयीन सचिव समीरा चव्हाण, सचिव विनायक मुंबईकर, संघटक रवींद्र कोरडे, कंपनीतर्फे जनरल मॅनेजर राजेश पालकर, एम. गणेसन, भरत सकपाले, साईट हेड अविनाश परांजपे, उपव्यवस्थापक हर्षल पाटील, कामगार प्रतिनिधी राजेंद्र तारेकर, सुरेश म्हात्रे, शिवराम म्हात्रे, प्रकाश एडगे, गणेश पाटील आदी उपस्थित होते.

Check Also

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे -आमदार प्रशांत ठाकूर

खारघरमध्ये पर्यावरणपूरक शवदाहिनीचे लोकार्पण, प्राणी अंत्यसंस्कार केंद्राचे भूमिपूजन खारघर ः रामप्रहर वृत्तपर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपण …

Leave a Reply