Breaking News

डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीसदस्यांचे श्रमदान ; श्रीवर्धनमधील शासकीय कार्यालयांचा परिसर स्वच्छ

श्रीवर्धन : प्रतिनिधी

डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष व  स्वच्छतादूत पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी श्रीवर्धन शहरातील सार्वजनिक रस्ते आणि शासकीय कार्यालय परिसरात  स्वच्छता मोहीम राबविण्यांत आली.

प्रतिष्ठानतर्फे मागील महिन्यात श्रीवर्धन तालुक्यातील स्मशानभ्ाूमी, कब्रस्तान व दफनभ्ाुमी परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले होते. रविवारी सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीवर्धन नगर परिषद, पोलीस ठाणे, तहसिल व उपविभागीय अधिकारी कार्यालय परिसरात तसेच शहरातील श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे प्रवेशद्वारापासून छत्रपती शिवाजी चौक ते गंद्रे नका, शिवाजी चौक ते बाजारपेठ जामा मशिद, प्रभ्ाु आळी, गंद्रे नाका ते चौकरपाखाडी चौक इत्यादी ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यांत आले. या मोहिमेेत प्रतिष्ठानचे सदस्य, सरकारी कर्मचारी यांनी सहभागी झाले होते.

या अभियानात श्रीवर्धन नगर परिषदेने स्वच्छतेसाठी लागणारी अवजारे, पावडर, फिनेल देऊन मोलाचे सहकार्य केले. प्रतिष्ठानच्या सदस्यांनी स्वयंस्फुर्तीने झाडू, घमेले, कोयते, फावडे घेऊन सकाळी 7 ते 10 या वेळेत शहर स्वच्छता केली. त्यावेळी 975 श्री सदस्य या अभियानत सहभागी झाले होते.

श्रीसदस्यांनी रविवारी दिवसभर श्रमदान करुन श्रीवर्धनमधील  जीवनेश्वर कुंडातील गाळ काढून,  कुंडाची संपुर्ण स्वच्छता केली.

………………………………………………………………………………….

पेणमध्ये शासकीय कार्यालयांसह रस्ते झाले चकाचक

पेण : प्रतिनिधी

स्वच्छतादूत डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे रविवारी राबविण्यात आलेल्या मोहीमेत पेण शहरातील तहसील, प्रांताधिकारी, सार्वजनिक बांधकाम कार्यालय, पोलीस स्टेशन, पेण बस स्थानक, रामवाडी बस आगार, रामवाडी एसटी विभागीय कार्यालय, पेण उपजिल्हा रुग्णालय, रेल्वे स्टेशन, वैकुंठ धाम, कुंभार आळी आदींसह पेण प्रायव्हेट हायस्कुल रस्ता, धरमतर रोड, चिंचपाडा रोड, उत्कर्ष नगर, साई मंदिर, रायगड बाजार परिसर तसेच पेण-अंतोरे रस्ता, चिंचपाडा रस्ता, हुडको कॉलनी असे एकूण 50 कि.मी चे रस्ते व 9 हजार 710 चौ.मीटर शासकीय कार्यालय परिसर स्वच्छ केला.

 शहरांतील सर्व शासकीय कार्यालये, रस्ते, बसस्थानक, रेल्वेस्थानक आदि नागरिकांच्या गर्दीच्या ठिकाणी पावसाळ्याअगोदर केलेल्या स्वच्छतेमुळे हा परिसर रोगराई पासूनमुक्त झाला आहे.

या स्वच्छता मोहिमेत पेण तालुक्यातील 16 बैठकांतील तब्बल 1472 श्री सदस्यांनी सक्रिय सहभाग घेऊन 6 हजार 710 चौ. मी. शासकीय कार्यालयाचा भाग आणि 50 किलोमीटरचे रस्ते स्वच्छ करून 21.20 टन ओला कचरा, 35.32 टन सुका कचरा असा एकूण 56.52 टन कचरा गोळा करून 7 ट्रॅक्टर ट्रॉली, 16 पिकअप व्हॅन, 7 छोटा टेम्पो  अशा 30 वाहनांतून आंबेघर येथील डम्पिंग ग्राउंडवर नेण्यात आला.

या अभियानात पेण तालुक्यातील पेण, दादर, वरवणे, सापोली, हनुमान पाडा, वरसई, धावटे, वाशी, रावे, वडखळ, आंबिवली, भाल, वाशीनाका, जिते, शिर्की येथील बैठकीतील श्री सदस्यांसह शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी वर्ग, न्याय संस्थेचे न्यायाधीश, आरोग्य कर्मचारी, पोलीस ठाण्याचे कर्मचारी, वन खात्याचे कर्मचारी, बस व रेल्वे स्थानकाचे कर्मचारी व नागरिकांची मोठी उपस्थिती होती.

…………………………………………………………………………..

रेवदंडा ते पालव रस्ता साफसुफ

रेवदंडा : प्रतिनिधी

ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसा निमित्त श्री सदस्यांनी रविवारी रेवदंडा ते पालव या रस्त्यावर स्वच्छतेसाठी श्रमदान केले.

साळाव पुल, चेकपोस्ट तसेच रेवदंडा ते पालव या रस्त्यावर श्री सदस्यांनी रविवार सकाळी साडेसातचे सुमारास हातात झाडू, फावडे, घमेले इत्यादी साहित्य घेवून स्वच्छतेच्या कामास सुरूवात केली. त्यांनी रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी, झुडपे, गवत यांची सफाई करून, निर्माण झालेल्या कचर्‍याची योग्य विल्हेवाट लावली. यावेळी अनेक छोट्या वाहनामधून कचरा योग्य ठिकाणी नेण्यात आला.

श्री सदस्यांनी केलेल्या साफसफाईने रेवदंडा ते पालव तसेच साळाव पुल व चेकपोस्ट नजीकचा रस्ता चकाचक झाल्याचे चित्र पहावयास

मिळाले.

Check Also

पनवेल रेल्वेस्थानकात आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून पाहणी

पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल रेल्वेस्थानक परिसरात सध्या नवीन रेल्वे ट्रॅक, पार्किंग आणि प्लॅटफॉर्मवरील विविध कामे …

Leave a Reply