Breaking News

थोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांचा गुरुवारी जयंती सोहळा

पद्मश्री भिकूजी (दादा) इदाते यांचा स्व. जनार्दन भगत जीवन गौरव पुरस्काराने होणार सन्मान

पनवेल : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे प्रेरणास्थान, गोरगरीब व कष्टकर्‍यांचे द्रष्टे नेते, थोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांचा जयंती सोहळा व स्व. जनार्दन भगत जीवन गौरव पुरस्कार सोहळा गुरुवारी (दि.29) सकाळी 11 वाजता खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात स्व. जनार्दन भगत जीवन गौरव पुरस्काराने महाराष्ट्रातील अग्रगण्य सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रीय विमुक्त, भटक्या आणि अर्ध-भटक्या जमाती आयोगाचे माजी अध्यक्ष व निती आयोग उपसमिती सदस्य पद्मश्री भिकूजी (दादा) रामजी इदाते यांना सन्मानित करण्यात येणार आहे. संसद महारत्न पुरस्कारप्राप्त मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते आणि जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या या सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार आदरपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.
या सोहळ्यास विशेष अतिथी म्हणून रयत शिक्षण संस्थेचे संघटक डॉ. अनिल पाटील, आमदार रविशेठ पाटील, आमदार महेश बालदी, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यकारी मंडळ सदस्य आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष माजी आमदार धैर्यशील पाटील, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, तर सन्माननीय उपस्थिती इंटकचे राष्ट्रीय सचिव महेंद्र घरत, माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे यांची असणार आहे.
सोहळ्यास पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, उपकार्याध्यक्ष वाय.टी. देशमुख, सचिव डॉ. एस.टी. गडदे यांनी केले आहे.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply