Breaking News

रोह्यात बाहेरील नागरिकांचा लोंढा

ग्राम प्रशासन सतर्क

रोहे ः प्रतिनिधी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जारी करण्यात आल्यापासून रोहा  तालुक्यात बाहेर ठिकाणाहून 12,070 नागरिक आले आहेत. यामध्ये परदेशातून 30, परराज्यातून 182, तर राज्यभरातून 11,858 नागरिक आले आहेत. मागील दोन दिवसांत 155 नागरिक रोह्यात आले आहेत. या लोकांना होम क्वारंटाइन करण्यात आले होते. यातील बहुतांश लोकांचे होम क्वारंटाइन संपले असून अद्याप रोहा तालुक्यात 1833 लोक होम क्वारंटाइन आहेत. गावी जाण्याची मुभा मिळाल्यानंतर नागरिक गावाकडे येत आहेत. मागील दोन दिवसांत शंभरहून अधिक लोक आल्याने आता हे प्रमाण वाढणार असल्याने याचा ताण ग्राम प्रशासनावर पडणार आहे. त्या अनुषंगाने ग्राम प्रशासनातील सरपंच, ग्रामसेवक, आशा, अंगणवाडी सेविका, आरोग्यसेवक, पोलीस पाटील सतर्क झाले आहेत.

Check Also

पनवेलच्या झोपडपट्टी पुनर्वसनासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांचा पाठपुरावा

मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा आणि त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न …

Leave a Reply