पनवेल : वार्ताहर
मेसर्स गुरुजी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड यांनी पनवेल महापालिका प्रशासनात काम करणार्या कंत्राटी कामगारांना दिवाळी बोनस म्हणून एक महिन्याचे वेतन दिल्याने कामगारांनी आनंद व्यक्त केला. पनवेल महापालिका प्रशासनात मनपा स्थापनेपासून कंत्राटी कामगार काम करत असून कायम कामगारांच्या बरोबरच कंत्राटी कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. गुरुजी कंत्राटंदार यांच्या कडे आस्थापना विभाग 227, फायरमन 42 व पाणी पुरवठा पनवेल महापालिका विभाग 104 असे एकूण 373 कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. कंत्राटी कामगारांच्या परिश्रमामुळे महापालिकेस स्वच्छता अभियानात राज्यामध्ये दोन वेळा पारितोषिक मिळाले होते. पनवेलकरांना नागरी सुविधा पुरविण्याचे आणि पनवेलच्या नागरी समस्या सोडविण्याचे महत्वपूर्ण काम कंत्राटी कामगारांच्या माध्यमातूनच आजही केले जात आहे. कंत्राटी कामगारांना सुद्धा एक महिन्याचे वेतन बोनस म्हणून मिळाल्याने सर्व कर्मचार्यांनी पालिका प्रशासन आणि मेसर्स गुरुजी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंत्राटदारचे आभार मानले असून इतर पालिकेच्या तुलनेत आम्हाला दर महिन्याला वेतनसुद्धा महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मिळत असल्याचे कंत्राटी कामगारांनी सांगितले.