Breaking News

विकास आराखडा हरकत आणि सूचनांची मुदत वाढवा

आगरी-कोळी फाऊंडेशनची मागणी

नवी मुंबई : बातमीदार

आगरी-कोळी युथ फाउंडेशनच्या शिष्ट मंडळाने नवी मुंबई महापालिकेचे नवनिर्वाचित आयुक्त राजेश नार्वेकर यांनी भेट घेतली. नवी मुंबई पालिकेच्या माध्यमातून जो प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे, त्याच्या हरकती व सूचना नोंदवण्याबाबत मुदतवाढ करण्याची विनंती आयुक्तांकडे करण्यात आली. यासोबतच फाउंडेशनच्या वतीने 19 सप्टेंबर रोजी जी सहापानी हरकत आणि सूचना प्रारूप विकास आराखड्यातील ठळक त्रुटीं संदर्भात नोंदवल्या गेल्या आहेत. त्याचे गांभीर्य आयुक्तांच्या निदर्शनात आणून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. पालिकेच्या माध्यमातून मराठी प्रारूप विकास आराखडा हा 30 सप्टेंबर 2022 नंतर प्रसिद्ध झाला असून, पालिकेने क्षेत्र सभा घेऊन विकास आराखड्याबद्दल पुरेशी जनजागृती केलेली नाही. त्याच बरोबर ऑक्टोबर महिन्यातच दिवाळी सण असल्याने नागरिकांना सूचना हरकती नोंदवण्यामध्ये व्यत्यय येत असल्याचे आयुक्तांच्या निदर्शनात आणून दिले. त्यामुळे पालिकेच्या सदर प्रारूप विकास आराखड्यातील सुधारणे विषयी अधिकाधिक लोकसहभाग नोंदवण्याच्या अनुषंगाने सदर प्रारूप विकास आराखड्या बाबतीत हरकती आणि सूचना नोंदवण्याची मुदत किमान 60 दिवस अजून वाढवावी अशी विनंती आयुक्तांना आगरी-कोळी युथ फाउंडेशनच्या वतीने ह्यावेळी करण्यात आली. भेटीसाठी आगरी-कोळी युथ फाउंडेशनच्यावतीने संस्थापक अध्यक्ष सीए निलेश पाटील, उपाध्यक्ष रवी मढवी, बेलापूर विधानसभा अध्यक्ष अविनाश सुतार, ऐरोली विधानसभा अध्यक्ष संदीप पाटील, आणि सहसचिव  विलास म्हात्रे उपस्थित होते.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply