Breaking News

रिसमध्ये डॉ. आंबेडकर जयंती साधेपणाने

मोहोपाडा : प्रतिनिधी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती यावर्षी रिस येथील सम्यक सामाजिक संस्थेच्या कार्यालयात साधेपणाने साजरी करण्यात आली. कोविड-19च्या दुसर्‍या लाटेमुळे परिस्थितीचा व वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येचा विचार करता यावर्षी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती रिस व रसायनी परीसरात साधेपणाने साजरी करण्यात आली. रिस कार्यालयात डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेला सम्यक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रकाशशेठ गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर उपस्थितांचे स्वागत करून मान्यवरांनी डॉ. बाबासाहेबांच्या जीवनावर प्रकाश टाकला. डॉ बाबासाहेबांच्या महान कार्याचा इतिहास अ‍ॅड. डि. टी. दांडगे यांनी उपस्थितांसमोर मांडला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य हे केवळ एका समाजापुरते मर्यादित नसून ते सर्व भारतीयांसाठी प्रेरणादायी आहे. बाबासाहेबांच्या कार्यामुळेच आज बहुजन समाजाचा व सर्व जाती धर्माच्या लोकांना आपले हक्क मिळाले आहे, असे सम्यक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रकाशशेठ गायकवाड यांनी बोलताना सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभारप्रदर्शन संदिप निकाडे यांनी केले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर अभियंता प्रकोष्ठ प्रदेश प्रभारीपदी

भाजपच्या संघटनात्मक विस्तारात नव्या जबाबदारीची भर पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस …

Leave a Reply