Breaking News

फिफा, सीआयईएस संस्थांशी ‘पिल्लई’चा करार

मोहोपाडा : प्रतिनिधी

विद्यार्थ्यांना क्रीडा व्यवस्थापनाचे धडे गिरविण्याची संधी देण्यासाठी महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या पिल्लई ग्रुप ऑफ इन्स्टिट्युटने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फिफा आणि सीआयईएस संस्थांशी करार केला आहे. अशी कामगिरी करणारे नवीन पनवेल येथील पिल्लई महाविद्यालय आशिया खंडातील पहिले महाविद्यालय ठरले आहे. फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल फुटबॉल असोसिएशन आणि स्वित्झर्लंड येथील आंतरराष्ट्रीय क्रीडा अभ्यास केंद्र (सीआयईएस) या जागतिक संस्थांच्या माध्यमातून दिला जाणारा क्रीडा व्यवस्थापनातील कार्यक्रम नवीन पनवेल महात्मा एज्युकेशन सोसायटीत उपलब्ध करण्यात आला आहे. जगातील विविध 15 देशांमध्ये खेळाडूंना या दोन संस्थांच्या माध्यमातून क्रीडा व्यवस्थापनाचा अभ्यास शिकविला जातो. भारतात यापूर्वी कुठेही न शिकविला जाणारा अभ्यासक्रम पनवेलच्या पिल्लई संस्थेत शिकविला जाणार आहे. क्रीडा व्यवस्थापनातील अभ्यासक्रमात सहभागी होण्यासाठी आशिया खंडातील 300हून अधिक अर्ज प्राप्त झाले, मात्र कठोर प्रवेश प्रक्रियेनंतर 40 जणांना पहिल्या टप्प्यातील अभ्यासक्रमासाठी सहभागी करून घेण्यात आले आहे. नवीन पनवेल येथील पिल्लाई महाविद्यालयात झालेल्या उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुण्या म्हणून अल्टिमेट टेबल टेनिस आणि चेन्नई फुटबॉल क्लबच्या मुख्य कार्यकारी अधिकारी विटा दाणी, फिफा, सीआयईसचे व्यवस्थापक रोनाल्ड चॅवल्हिन, पिल्लई क्रीडा व्यवस्थापन अभ्यासक्रमाचे संचालक प्रणव पिल्लई, पिल्ले ग्रुपचे अध्यक्ष डॉ. के. एम. वासुदेवन, क्रीडा क्षेत्रातील सल्लागार शाजी प्रभाकरन यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, खेळाडू उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देश क्रीडा क्षेत्रात पुढे जात आहे. जगात भारत अव्वल ठरावा यासाठी प्रयत्न होताना दिसत आहेत. त्यामुळे येत्या काळात क्रीडा व्यवस्थापनाला महत्त्व प्राप्त होणार आहे. या क्षेत्रात खेळाडूंसाठी करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. भारताच्या आर्थिक प्रगतीलादेखील हे क्षेत्र बळकटी देणारे ठरेल, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला. प्रणव पिल्लई यांनी प्रास्ताविकात सांगितले की, आमच्या संस्थेच्या वतीने सुरुवातीपासून खेळाला अधिक महत्त्व प्राप्त करून दिले आहे. देशात अनेक ठिकाणी पिल्लईचे विद्यार्थी चमकदार कामगिरी करीत असतात. विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात, व्यवस्थापनात करिअर करता यावे म्हणून आमच्या महाविद्यालयाने आंतरराष्ट्रीय संस्थांशी हा करार केला आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply