पनवेल : वार्ताहर
पाऊस जास्तकाळ लांबल्यामुळे प्रभागातील रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डे पडले होते. बर्याचवेळा खड्डे बुजवल्यानंतर पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने खड्डे परत जैसेथे अशा अवस्थेत होत होते, परंतु नागरिकांना गैरसोय आणि या खड्ड्यांमुळे त्रास होऊ नये म्हणून भाजप नेते तथा माजी नगरसेवक विक्रांत पाटील यांनी महापालिका प्रशासनाच्या मागे लागून टप्याटप्याने खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात करून घेतली. सध्या वीर सावरकर चौक, सारस्वत बँकसमोर, श्री गजानन सहकारी गृह संस्थासमोर, स्टेटस हॉटेलसमोर आणि रिलायन्स फ्रेशसमोरील खड्डे बुजवण्यात आले आहेत. दुसर्या टप्यात प्रभागातील इतर रस्त्यांचे खड्डे बुजवण्यात येतील. प्रभागातील नागरिकांच्या समस्यांना त्वरित सोडवण्यासाठी विक्रांत पाटील हे नेहमीच तत्पर असतात त्याबद्दल नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.