Tuesday , March 21 2023
Breaking News

भाजप सोशल मीडिया सेल रायगड जिल्हा सदस्यपदी राजेंद्र कदम

खोपोली ः प्रतिनिधी

रायगड जिल्हा सहसंयोजक व कर्जत विधानसभा संयोजक (अध्यक्ष) राहुल जाधव यांनी राजेंद्र कदम यांची भारतीय जनता पार्टी सोशल मीडिया सेल रायगड जिल्हा सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. तसे नियुक्तिपत्र राजेंद्र कदम यांना खोपोली मंडळ अध्यक्ष श्रीकांत पुरी व खालापूर मंडळ अध्यक्ष बापू घारे यांच्या हस्ते भाजप खोपोली शहर मध्यवर्ती कार्यालय येथे देण्यात आले. या वेळी सरचिटणीस दिलीप पवार, दिलीप देशमुख, खोपोली शहर संयोजक प्रिन्सी कोहली, खालापूर तालुका सरचिटणीस यशवंत जोशी, खालापूर तालुका युवा मोर्चा सरचिटणीस स्वप्नील मुकादम, चौक जिल्हा परिषद विभाग अध्यक्ष गणेश मुकादम, शक्ती केंद्र प्रमुख साजगाव नरेश पाटील व इतर सोशल मीडियाचे पदाधिकारी व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

   येणार्‍या विधानसभा निवडणुकीसाठी सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम आहे. त्याचा फायदा पक्षाला नक्कीच होणार आहे. त्याकरिता संपूर्ण जिल्ह्यात व कर्जत मतदारसंघात नियुक्त्या करण्यात येत आहेत, असे सोशल मीडियाचे रायगड जिल्हा सहसंयोजक व कर्जत विधानसभा अध्यक्ष राहुल जाधव यांनी सांगितले.

Check Also

शासकीय कर्मचार्‍यांचा संप अखेर मागे!

सरकासोबत चर्चा यशस्वी मुंबई : प्रतिनिधी गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेला शासकीय, निमशासकीय कर्मचार्‍यांचा संप …

Leave a Reply