पनवेल ः प्रतिनिधी
पनवेल शहर स्मार्ट सिटी होण्याच्या दिशाने महापालिका विविध पातळीवर प्रयत्न करीत आहे. याच दृष्टीने ई-गव्हर्नसच्या माध्यामातून महापालिका विविध सेवा ऑनलाइन करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महानगरपालिका क्षेत्रातील व्यवसायधारकांना ऑनलाइन परवाना प्राप्त करण्यासाठी tradepanvelmc.org या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये मंगळवारी (दि. 18) आयुक्त गणेश देशमुख, उपायुक्त गणेश शेटे, उपायुक्त कैलास गावडे, सहाय्यक आयुक्त डॉ. वैभव विधाते, स्वच्छ भारतचे महापालिकेचे बॅ्रण्ड अॅम्बेसिडर सागर म्हात्रे, युनिसेफचे प्रतिनिधी आनंद घोडके, सीएसीआर कंपनीचे प्रतिनिधी नितीन वाधवानी, ब्लू प्लॅन्ट इन्हारमेंट सॉईलचे प्रतिनिधी सरफराज यांच्या हस्ते या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. महागरपालिका क्षेत्रातील सिडको हद्दीतील तसेच प्रभाग समिती कार्यालय ‘अ’,‘ब’,‘क’,‘ड’अंतर्गत सर्व व्यवसायाकरिता महानगरपालिकेकडून परवानगी घेणे बंधनकारक आहे. त्यासंबंधीत व्यवसायधारकांच्या सोयीकरिता tradepanvelmc.org या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली. या संकेतस्थळावर जाऊन सर्व व्यवसायधारक आपल्या मालकीतील, भोगवट्यातील, भागीदारीतील व भाड्याने दिलेल्या आस्थापनेची नोंदणी, तपासणी व ऑनलाइन पद्धतीने परवाना प्राप्त करू शकतील. अधिक माहितीकरीता pmc tradelicencegmail.com या ई-मेल आयडीवर संपर्क करण्याचे आवाहन परवाना विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
ऑलाइन परवान्यासाठी अशी आहे प्रक्रिया
1 .tradepanvelmc.org ही वेबसाईटवर उघडा.
2. नोंदणीकृत मोबाईल क्रमांक किंवा अर्ज क्रमांक वापरून
नागरिक त्यांच्या आस्थापना शोधू शकता.
3. पे बटणावर क्लिक करून पेमेंट करू शकता.
4. तुमचा ईमेल आयडी, संपर्क क्रमांक टाका.
5. पे नाऊ बटणावर क्लिक करा
6. ओटीपी प्रविष्ट करा.
7. पेमेंट यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर तुमच्या मोबईलवर
एसएमएसद्वारे आपल्याला सूचना प्राप्त होईल.
8. नागरिक गेट रिसिप्टवर क्लिक करून पेमेंट पावती
डाउनलोड करू शकतात.