पनवेल ः रामप्रहर वृत्त
स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि दैनिक लोकमत यांच्या संयुक्त विद्यमाने खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये शनिवारी (दि. 10) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते झाले. शिबिरास रक्तदात्यांचा प्रतिसाद लाभला.
या शिबिरावेळी नगरसेवक अभिमन्यू पाटील, रामजी बेरा, अॅड. नरेश ठाकूर, निलेश बावीस्कर, भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, चिटणीस चिन्मय समेळ, पनवेल शहर अध्यक्ष रोहित जगताप, उपाध्यक्ष अभिषेक भोपी, कादीर शेख, रोहित कोळी, सिद्धेश खानावकर, रविना आर्या, गोविंद झा, खारघर शहर सरचिटणीस दीपक शिंदे, किरण पाटील, विजय उजळंबे, नितेश पाटील, काशिनाथ घरत, आदर्श सहाणी, नीलम विसपुते, बिना गोगरी, जयेश गोगरी, पत्रकार विनोद भांडारकर, भालचंद्र जुमलेदार, वैभव गायकर, राजू म्हात्रे आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
Check Also
नमो चषकात कबड्डीचा थरार!
पुरुष गटात नवकिरण, तर महिला गटात कर्नाळा स्पोर्ट्स विजयी उलवे नोड : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ …