मुंबई : प्रतिनिधी
राज्यात आरोग्य विभागामध्ये 10 हजार पदांची भरती करणार असल्याची घोषणा राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी (दि. 21) पत्रकार परिषदेत केली. या संदर्भात येत्या 1 ते 7 जानेवारीदरम्यान जाहिरात निघणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मंत्री महाजन म्हणाले की, मार्च 2018मध्ये आरोग्य विभागात 13 हजार जागांची भरती निघाली होती, मात्र मधल्या काळात याकडे दुर्लक्ष झाले. आता आम्ही 10 हजार 127 जागा भरणार आहोत. त्यासाठीचे वेळापत्रक निश्चित केले आहे.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …