खारघर : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमधील तीन विद्यार्थ्यांनी रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत सुयश प्राप्त केले आहे. संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
विद्यालयातील श्लोक कोकणे या विद्यार्थ्याने पनवेल येथे झालेल्या जलतरण स्पर्धेत मुलांच्या 14 वर्षाखालील गटात व 200 मिटर फ्री स्टाईल प्रकारात सुवर्णपदक, तर याच गटात व 50 मिटर फ्री स्टाईल प्रकारात कांस्यपदक पटकाविले. 19 वर्षाखालील मुलांच्या गटात व 50 मीटर फ्री स्टाईल प्रकारात कल्प पटेल याने रौप्यपदक आणि याच गटात व प्रकारात मुलींमध्ये सिद्धी पिंपळे हिने रौप्यपदक प्राप्त केले.
या सर्व विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणारे अपूर्व अगरवाल यांचे संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, सचिव डॉ. एस. टी. गडदे, मुख्याध्यापिका राज अलोनी यांनी कौतुक केले.
Check Also
कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा
विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …