Breaking News

दिवाळी सुट्टीनिमित्त रायगडचे किनारे पर्यटकांनी बहरले

अलिबाग : प्रतिनिधी
दिवाळी सण संपला तरी शाळा, महाविद्यालयांना दिवाळीची सुटी आहे. या सुटीचा आनंद घेण्यासाठी  पर्यटक मोठ्याप्रमाणावर बाहेर पडले आहेत. पर्यटनासाठी  पर्यटकांनी रायगडला पसंती दिली आहे. त्यामुळे रायगडातील पर्यटनस्थळे तसेच सर्व समुद्रकिनारे गर्दीने फुलून गेले आहेत.
रूपेरी वाळू, निळाशार समुद्र आणि नारळी पोफळीच्या बाग यामुळे रायगडचे किनारे पर्यटकांचे नेहमीच आकर्षण ठरले आहे.  गेली तीन वर्ष करोनामुळे हे किनारे ओस पडले होते. आता दिवाळीत मात्र पर्यटकांची पावले पुन्हा रायगडकडे वळली आहेत. मुंबई, पुण्यासह राज्यभरातील पर्यटकांनी इथे गर्दी केली आहे. दोन चार दिवस निवांत स्वच्छंदी जीवन जगण्यासाठी लोक घराबाहेर पडले आहेत. निमित्त दिवाळीचे असले तरी पर्यटक रायगडच्या किनारयांवर मोकळा श्वास घेताना दिसत आहेत. वेगवेगळे वॉटरस्पोर्ट्स, उंटसवारी  याचा आनंद बच्चे कंपनी घेत आहेत. कोरोनामुळे रायगडचा पर्यटन व्यवसाय व्हेंटीलेटरवर होता या व्यवसायातील अनेकजण कर्जबाजारी झाले होते, पण आता पर्यटन व्यवसायावरील हे मळभ दूर झाले आहे. हॉटेल व्यवसाय तेजीत आहे. कॉटेजयेस फूल आहेत.
अलिबागसह नागाव, किहीम, काशीद, दिवेआगर, मुरूड इथल्या किनार्‍यांवर पर्यटकांची गर्दी झालेली पहायला मिळते आहे. माथेरानचे रस्तेही गजबजले आहेत. त्यामुळे व्यावसायिक खुश आहेत.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply