Breaking News

पथनाट्यातून जनजागृती;पनवेलमध्ये निवडणूक आयोगाचा उपक्रम

पनवेल ः रामप्रहर वृत्त

भारत सरकार, सूचना व प्रसारण मंत्रालय, रिजनल आउटरिच ब्युरो, गीत व नाटक विभाग महाराष्ट्र व गोवा, भारत निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी कार्यालय तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय, रायगड आणि स्वयंसिद्धा सामाजिक विकास संस्था, रोहा यांच्या सयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. 5) पनवेलमध्ये पथनाट्यातून जनजागृती केली.

निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी वैशाली माने, नोडल अधिकारी स्वीप समिती तथा जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली, तसेच उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी 188 पनवेल दत्तात्रेय नवले   यांच्या सहकार्याने हा उपक्रम पार पडला.

या वेळी या कार्यक्रमास मतदार डिस्ट्रिक्ट युथ आयकॉन तथा राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी तपस्वी गोंधळी, स्वीप पथक प्रमुख मंगेश जाधव, जयराम पादीर, महेश भापकर यासह अन्य मान्यवर व बहुसंख्य जनसमुदाय उपस्थित होता.

या पथनाट्याचे नेतृत्व स्वयंसिद्धा संस्थेच्या अध्यक्षा सुचिता साळवी करीत असून 20 जिल्ह्यांमध्ये मतदानाचा टक्का कमी असणार्‍या 120 तालुक्यांमध्ये चित्ररथाच्या माध्यमातून मतदार जनजागृती करण्यात येत आहे. पथनाट्य दौर्‍यामध्ये कलाकार म्हूणन प्रतिक कोळी, प्रतिक पाटील, विनोद नाईक, सौरभ मोरे, अमृता शेडगे, प्रांजली पाटील, प्रतीक्षा शिपाई, स्वप्नाली थळे आदी कलाकार सहभागी झाले आहेत. चित्ररथाच्या माध्यमातून पनवेलमधील तहसील कार्यालय, शिवाजी महाराज चौक, सोसायटी नका पनवेल, रेल्वे स्टेशन, कोहिनूर टेक्निकल, डॉ. आंबेडकर भवन शेजारी, टेम्बोले नाका, शिवा कॉम्प्लेक्स न्यू पनवेल, बस स्टॅन्ड, खांदा कॉलनी, कामोठे आशा विविध ठिकाणी जनजागृती केली.

Check Also

आमदार महेश बालदी 29 ऑक्टोबर रोजी दाखल करणार अर्ज

उरण : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघातून भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय व मित्रपक्ष युतीचे …

Leave a Reply