Breaking News

नवी मुंबईत उत्तर भारतीयांची छट्पूजा उत्साहात

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

नवी मुंबई शहरात छट्पूजा उत्सव मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा केला जात आहे. नवी मुंबई शहरात पाम बीच ज्वेल ऑफ नवी मुंबई या परिसरात तसेच शहरातील विविध तलावांच्या ठिकाणी छट्पूजेचा उत्साह सुरू आहे. तीन दिवस चालणार्‍या उत्सवाचा आजचा दुसरा दिवस. शहरात मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीयांनी छट्पूजेचे आयोजन केले आहे. आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभो व संसार सुखाचा होवो यासाठी ही छट्पूजा केली जात असल्याची माहिती दिनेश शंतीप्रसाद यादव यांनी दिली. नवी मुंबई शहरात विविध जाती धर्माचे तसेच विविध प्रांतातून आलेले नागरिक राहतात. यामध्ये बिहार, उत्तर प्रदेश या विभागातील नागरिकांची संख्याही खूप मोठी आहे. या उत्सवासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते आज शहरात विविध तलावांच्या ठिकाणी तसेच पामबीच खाडी किनारी हा उत्सव साजरा करण्यात आला.

Check Also

शेल इंडिया मार्केट्स कंपनीच्या कामगारांना भरघोस वेतनवाढ

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत करार पनवेल : रामप्रहर वृत्तशेल एम्प्लॉईज युनियनच्या मार्गदर्शनाखाली शेल …

Leave a Reply