Breaking News

गुजरातमधील पूल दुर्घटनेस तरुणांची हुल्लडबाजी कारणीभूत?

व्हिडीओ व्हायरल

अहमदाबाद : वृत्तसंस्था
गुजरातमधील मोरबी येथील मच्छू नदीवर असलेला 100 वर्षे जुना झुलता पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 140 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर संपूर्ण देशभरातून शोक व्यक्त होत आहे. दरम्यान, पूल कोसळतानाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून यामध्ये काही तरुण पुलावर उड्या मारताना दिसत आहेत. या हुल्लडबाजीमुळेच दुर्घटना झाल्याचा दावा काही साक्षीदार करीत आहेत.
सीसीटीव्हीत पुलावर तरुणांची गर्दी असल्याचे दिसत आहे. या वेळी काही तरुण फोटोशूट करत असताना, त्यांच्या पुढे उभे असणारे तरुण पुलावर उड्या मारताना दिसत आहे. यादरम्यान पूल हालत असल्याचेही व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे. यानंतर काही वेळातच पूल कोसळतो आणि सर्वजण खाली नदीत पडतात. हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
दरम्यान, पूल दुर्घटनेप्रकरणी कारवाईस सुरुवात झाली असून या पुलाचे नुतनीकरण करणार्‍या कंपनीच्या दोन कर्मचार्‍यांना अटक करण्यात आली आहे. वृत्तानुसार या पुलाचे नुतनीकरण ओरेव्हा या कंपनीने केले होते.
या कंपनीवर यापूर्वीही अनेक पुलांचे अर्धवट बांधकाम केल्याचा आरोप आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply