Breaking News

जासई हायस्कूलमध्ये राष्ट्रीय एकता दिन साजरा

उरण : बातमीदार, प्रतिनिधी

रयत शिक्षण संस्थेच्या जासई येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्युनिअर कॉलेजच्या शैक्षणिक संकुलात सोमवारी (दि. 31) राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे भारतीय मजदूर महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री, शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष, कामगार नेते सुरेश पाटील यांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि रयत शिक्षण संस्थेचे लाइफ वर्कर अरुण घाग यांनी केले. या वेळी राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ घेण्यात आली. विद्यार्थ्यांमार्फत राष्ट्रीय एकता रॅलीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन राष्ट्रीय एकात्मतेवर घोषणा देऊन रॅली काढली. या कार्यक्रमासाठी रयत सेवक संघाचे महाराष्ट्र समन्वयक नूरा शेख, विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका एस. एस. पाटील, गुरुकुल प्रमुख जी. आर. म्हात्रे, ज्युनिअर कॉलेजचे सर्व प्राध्यापक वर्ग तसेच माध्यमिक विभागाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.  या कार्यक्रमासाठी माजी सरपंच धिरज घरत, ग्रामविस्तार अधिकारी पालकर, ग्रामपंचायत सदस्य मनीषा घरत, पूजा कांबळे, पौर्णिमा कांबळे व इतर शिक्षण प्रेमी नागरिक उपस्थित होते.

Check Also

माथेरानमधील हातरिक्षा संघटनेच्या आणखी सात सदस्यांचा भाजपत प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी माथेरानमधील हातरिक्षाचालक संघटनेच्या आणखी सात …

Leave a Reply