Breaking News

भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत पंतप्रधान मोदी, देवेंद्र फडणवीस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने 30 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव पहिल्या स्थानावर आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची नावे या यादीमध्ये आहेत. स्टार प्रचारकांच्या यादीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचेही नाव आहे. त्यांच्या व्यतिरिक्त भाजपची सत्ता असलेल्या अन्य कुठल्या राज्यातील मुख्यमंत्र्यांचा स्टार प्रचारकांमध्ये समावेश केलेला नाही. पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी रविवारी (दि. 11) बिहारमध्ये पहिली सभा घेतली. मोदी हैं तो मुमकीन हैं, नितीश हैं तो संभव हैं असा नारा नड्डा यांनी गया येथील सभेत दिला.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply