Breaking News

तुरमाळे, सांगुर्लीत हर घर जल मिशन योजना

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून हर घर जल मिशन योजना प्रभावीपणे राबविली जात आहे. त्या अंतर्गत भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नामुळे पनवेल तालुक्यात या योजनेकरिता एक कोटी सहा लाख रुपयांचा निधीची मंजूर झाला आहे. यामध्ये तुरमाळे येथे 57 लाख आणि सांगुर्ली येथे 49 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या योजने अंतर्गत दोन्ही गावांत पिण्याच्या पाण्याची टाकी उभारण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 1) झाले.
या विकासकामाच्या भूमिपूजन समारंभास भाजपचे केळवणे विभागीय अध्यक्ष मंगेश वाकडीकर, नांदगावचे माजी सरपंच अविनाश गायकर, तुरमाळेचे  माजी सरपंच दत्तात्रेय हातमोडे, सांगुर्ली ग्रामपंचायतीचे सदस्य शरद वांगीलकर, संतोष पारधी, माजी सदस्य विष्णू ठोकळ, जगदिश पाटील, शिरढोणचे माजी उपसरपंच विजय भोपी, भाजपचे सांगुर्ली ग्रामपंचायत केंद्र प्रमुख अ‍ॅड. निलेश हातमोडे, संतोष वाजेकर, विशाल गायकर, योगेश देशमुख, जगन्नाथ हातमोडे, अजित म्हात्रे, अनिकेत वाजेकर, यशवंत हातमोडे, शंकर गायकर, टी. के.जळे, ज्ञानेश्वर गायकर, भूषण हातमोडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

केंद्र सरकार पाच वर्ष टिकेल -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत ः प्रतिनिधी मला या निवडणुकीत खूप काही शिकता आले. विरोधकांनी जाती जातीत तेढ निर्माण …

Leave a Reply