पेण : प्रतिनिधी
ट्रॉफी फाईटर्स फाऊंडेशन आणि रायगड जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वरिष्ठ गट (सिनिअर) व सब ज्युनिअर मुले व मुली यांची जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट निवड चाचणी स्पर्धा नुकतीच पेण प्रायव्हेट हायस्कूल मैदानात उत्साहात झाली.
स्पर्धेच्या उदघाटन समारंभास माजी जि.प.सदस्य प्रभाकर म्हात्रे, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त व संघटनेचे सचिव संदीप प्रल्हाद गुरव, ट्रॉफी फाईटर्स फाउंडेशनचे अध्यक्ष सुधाकर म्हात्रे, टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष किरण पाटील, टेक्निकल डायरेक्टर भरत गुरव, रत्नाकर ठाकूर, महेश म्हात्रे, सुशिल म्हात्रे, नरेश म्हात्रे, विनायक म्हात्रे, दीपक पाटील, जयदीप पाटील, दत्ता म्हात्रे, मानसी म्हात्रे, तृप्ती म्हात्रे यांच्यासह मोठ्या संख्येने खेळाडू आणि क्रिकेटप्रेमी उपस्थित होते. या वेळी क्रीडापटू व मार्गदर्शक स्व. संतोष गुरव यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
या वेळी निवडण्यात आलेले संघ परभणीतील प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम येथे होणार्या सातव्या सिनिअर व सहाव्या सब ज्युनिअर राज्यस्तरीय टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेसाठी रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील आणि या राज्यस्तरीय स्पर्धेतून निवडलेले खेळाडू जम्मू-काश्मीर येथे 8 ते 11 डिसेंबर रोजी होणार्या राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करतील.
निवड चाचणी स्पर्धेतून निवडलेला रायगडचा संघ
वरिष्ठ गट (सिनिअर) मुले : निहार म्हात्रे (कर्णधार), तुषार म्हात्रे, सचिन म्हात्रे, कुणाल निकम, राजा निसाद, शुभम म्हात्रे, अनुप पाटील, शंतनू परब, हर्षल म्हात्रे, आदित्य गदमले, सोहम म्हात्रे, राज पाटील, पियुष माळी, विशाल मालुसरे, सबज्युनिअर गट : हर्ष म्हात्रे, अनुज पाटील,अर्याश पाटील, स्मित म्हात्रे, आशिष म्हात्रे, पार्थ वैशंपायन, जतीन पाटील, रिधम पाटील, सिद्धांत गुरव, प्रशिक्षक : महेश म्हात्रे, व्यस्थापक : भरत गुरव.
Check Also
‘नेहले पे देहला’ @ ५० वर्षे; पडद्यामागच्या गोष्टी जास्त रंजक
सुनील दत्तच्या वांद्य्रातील पाली हिलवरील अजंठा बंगल्यातील तळघरात असलेल्या मिनी थिएटरमध्ये एखादा चित्रपट अथवा गाणी …
RamPrahar – The Panvel Daily Paper