आमदार शहाजीबापू पाटील यांचे रेवदंड्यात प्रतिपादन
रेवदंडा ः प्रतिनिधी
ज्या जनतेने आमदार केले, त्यांच्याशी प्रामाणिक असल्याचे प्रतिपादन आमदार शहाजी बापू पाटील यांनी रेवदंडा येथील बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या पक्षप्रवेश सोहळ्या वेळी उपस्थितांना संबोधिताना केले. रेवदंडा येथील नानानानी पार्क येथे संभाजी बिग्रेडचे माजी जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल मोरे यांनी त्यांच्या समर्थकांसह बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. या वेळी आमदार महेंद्र दळवी, जिल्हाप्रमुख राजा केणी, जिल्हा संघटक मयुरेश गंभीर, कामगार नेते दिपक रानवडे, जिल्हा महिला संघटक शुभांगी करडे, माजी जि. प. सदस्य बाळासाहेब तेलंगे, जिल्हा नियोजन समिती सदस्य संतोष निगडे, शिवराज्य बिग्रेडचे जिल्हाध्यक्ष शैलेश चव्हाण, मुरूड तालुका प्रमुख ॠषीकांत डोंगरीकर, निलेश घाटवळ, रोहा तालुका प्रमुख अॅड. मनोज शिंदे, उद्देश वाडकर, भगिरथ पाटील, मुरूड-अलिबाग महिला संघटक शिला कडू, अलिबाग तालुका महिला संघटक स्मिता चव्हाण, भारती मोरे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थिती होते. प्रमुख अतिथी आमदार शहाजी बापू पाटील यांनी प्रारंभीच, 35 हजार मताधिक्क्याने निवडून येणारे आमदार महेंद्र दळवी यांच्या कर्तृत्व, दातृत्व व नेतृत्वाला सलाम असे गौरवोद्गार काढले. मतदारांनी शिवसेना व भाजप युतीला सत्तेसाठी निवडून दिले होते, परंतु ज्यांना निवडणुकीत हरविले त्यांचे सोबत बसावे लागले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, यासाठी सर्व मान्य केले, मात्र मतदारसंघातील विकासाला निधी दिला जात नव्हता. अशा वेळी निवडून दिलेल्या जनतेसाठी काही करता येत नव्हते, अखेर एकनाथ शिंदे यांना काहीतरी करा, असा आग्रह धरला. त्यामुळे 40 आमदारांच्या आग्रहाखातील एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीचा रस्ता पकडला, असे सांगितले, तसेच कष्टकरी व शेतकरी वर्गाने निवडून दिले आहे, निवडून दिलेल्या जनतेशी प्रामाणिक राहिलो हे स्पष्ट केले. आमदार महेंद्र दळवी यांनी, सर्वसामान्यात मिसळणारा कार्यकर्ता अशी ओळख प्रफुल्ल मोरे यांची करून देताना, अलिबाग तालुका प्रमुख म्हणून त्याचेवर सोपवलेली जबाबदारी योग्य असल्याचे म्हटले. या वेळी प्रफुल्ल मोरे यांना बाळासाहेबाची शिवसेना या पक्षाची अलिबाग तालुकाप्रमुख पदाचे नियुक्तीपत्र आमदार शहाजी बापु पाटील व आमदार महेंद्र दळवी यांचे हस्ते देण्यात आले. कार्यक्रमाचे शेवटी आमदार शहाजी बापू पाटील यांना बाळासाहेबांची शिवसेनेचे वतीने भित्तीचित्र देण्यात आले.