उरण : वार्ताहर – उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून शुक्रवारी (दि. 17) उरण पोलीस ठाण्यात कोरोना निर्जंतुकीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
कोरोनाचा संसर्ग होऊ नये, उरण पोलीस ठाण्यात तसेच उरण तहसिल कार्यालयात येणारी प्रत्येक व्यक्ती हि निर्जंतुकीकरण कक्षातून जाईल. या निर्जंतुकीकरणाचा परिणाम 24 तास राहतो. कपडे धुतल्यानंतर हि राहतो. या कक्षाचा सर्वांनी वापर करावा. ह्या उद्देशाने या कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
या वेळी उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी, पोलीस उपनिरीक्षक अनिल चव्हाण व स्टाफ उपस्थित होते. नागरिकांनी पोलीस ठाण्यात तसेच तहसिल कार्यालयात जाताना हात वर करून डोळे बंद करावे, निर्जंतुकीकरण कक्षाचा वापर करावा, असे आवाहन उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांनी केले.