Breaking News

पनवेलमध्ये शुक्रवारी बालनाट्य प्रशिक्षण कार्यशाळा

पनवेल : रामप्रहर वृत्त
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली लवकरच बालनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने तसेच इतर स्पर्धांच्या तयारीच्या दृष्टिकोनातून कलाकारांना मार्गदर्शन करणारी प्रशिक्षण कार्यशाळा येत्या शुक्रवारी (दि. 11) पनवेलमध्ये होणार आहे.
यापूर्वी झालेल्या सहविचार सभेत शिक्षकांनी केलेल्या विनंतीनुसार 11 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 ते सायंकाळी 5 या वेळेत पनवेल मार्केट यार्डमधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात नाट्यलेखन प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात येणार आहे. या कार्यशाळेमध्ये बालनाट्य हा काय साहित्यप्रकार आहे, त्याचे लेखन आणि उद्दिष्ट, विषयाची निवड आणि कथेचा विस्तार त्याचबरोबर पात्र निर्मिती आणि प्रसंग विस्तार, संवाद लेखन, नाट्य वाचन आणि फायनल ड्राफ्ट या सर्व गोष्टींबाबत चर्चा होऊन मार्गदर्शन होणार आहे. या वेळी सुप्रसिद्ध बालनाट्य लेखक दिग्दर्शक राजू तुलालवार यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
या कार्यशाळेसाठी 100 रुपये माफक शुल्क असून इच्छुकांनी श्यामनाथ पुंडे (9821758147) किंवा संतोष चव्हाण (9869967847) यांच्याकडे  10 नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply