लंडन : वृत्तसंस्था
इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील दुसर्या वन डे सामन्यात बॉल टॅम्परिंगचा प्रकार घडल्याची चर्चा होती. इंग्लंडचा गोलंदाज लिअॅम प्लंकेटने चेंडू कुरतडण्याचा आरोप करण्यात आला होता, मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) प्लंकेटनं असं काहीच चुकीचं केलं नसून त्याला क्लिन चीट दिली आहे. इंग्लंडच्या जोस बटलरने 55 चेंडूंत 9 षटकार व 6 चौकार खेचून नाबाद 110 धावा चोपल्या. त्याच्या या फटकेबाजीच्या जोरावर इंग्लंडने पाकिस्तानसमोर 374 धावांचे आव्हान उभे केले. पाकिस्तानकडूनही त्यांना कडवे उत्तर मिळाले, परंतु त्यांना अवघ्या 12 धावांनी हा सामना गमवावा लागला, पण या सामन्यात ‘बॉल टॅम्परिंग’चा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.