मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार ही ब्रिटनमधून परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी दिली आहे. केंद्र सरकारमार्फत ब्रिटन सरकारकडे यासाठी पाठपुरावा केला जाणार असल्याचं सांगत ही तलवार 2024पर्यंत महाराष्ट्रात परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी सांगितले. जगदंबा तलवार महाराष्ट्रात परत यावी यासाठी केंद्र सरकारकडे आम्ही पाठपुरावा करत आहोत. ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान झाल्यानंतर आता केंद्र सरकारच्या माध्यमातून जगदंब तलवार परत आणण्यासाठी प्रयत्न केले जातील. शिवराज्याभिषेकाला 2024मध्ये 350 वर्षे पूर्ण होतील. त्यासाठी राज्याच्या सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून आम्ही एक आराखडा तयार करत असून या वेळी जर जगदंबा तलवार भारतात परत आली तर आमचा आनंद द्विगुणित होईल, असे ते म्हणाले.
Check Also
तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा
कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …