Breaking News

उर्मिलाने काँग्रेस नेत्यांवर फोडले पराभवाचे खापर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीत स्थानिक काँग्रेस नेत्यांमुळेच आपला पराभव झाला, असे अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने म्हटले आहे. यासंदर्भात उर्मिलाने मुंबई काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष मिलिंद देवरा यांना पत्रदेखील लिहिले. नेत्यांची अकार्यक्षमता, ढिसाळ नियोजन, कार्यकर्त्यांशी तुटलेला संपर्क आणि पैशाची मागणी या मुद्द्यांचा उर्मिला पत्रात उल्लेख केल्याचे वृत्त आहे.

उर्मिला मातोंडकरने 16 मे रोजी हे पत्र लिहिले. निवडणुकीत विजयासाठी आपण अथक परिश्रम घेतले, पण काँग्रेसमधील नेत्यांचे सहकार्य मिळाले नाही. निवडणूक प्रचारासाठी नेमलेले मुख्य समन्वयक संदेश कोंडविलकर, दुसरे पदाधिकारी भूषण पाटील आणि जिल्हा अध्यक्ष अशोक सुत्राळे हे आपल्या पराभवाला कारणीभूत असल्याचे उर्मिलाने पत्रात नमूद केले आहे.

बॉलीवूडची अभिनेत्री असलेल्या उर्मिलाने उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. भाजपच्या गोपाळ शेट्टी यांनी तिचा पराभव केला. लोकसभा निवडणुकीतील पराभवावरून काँग्रेसमध्येच चिंतन व राजीनामासुरू आहे. अशातच उर्मिलाने पक्षातील पदाधिकार्‍यांनाच पराभवाचे दोषी ठरवल्याने काँग्रेसमधील मतभेद समोर आले आहेत.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply