Breaking News

कामोठे येथे 18 डिसेंबरला मॅरेथॉन

पनवेल : रामप्रहर वृत्त
कोरोनाविरुद्धचा लढा आपण जवळपास जिंकलेला आहे, पण आजही अनेक जण कोरोना इतक्याच भीषण आजाराशी लढा देत आहे आणि तो आजार आहे कॅन्सर. या लढ्यात कॅन्सरग्रस्तांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि कॅन्सरविषयी सर्वसामान्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी छाबा फाऊंडेशन ट्रस्टतर्फे येत्या 18 डिसेंबर रोजी एक धाव कॅन्सर योद्ध्यांंसाठी हे ध्येय वाक्य ठेवून मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
कामोठे सेक्टर 6मधील रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूलच्या मैदानात 18 डिसेंबरला सकाळी 6.30 वाजता या स्पर्धेची सुरुवात होणार असून याच ठिकाणी सकाळी 8.30 वाजता बक्षीस वितरण समारंभ होईल. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
6 ते 17 मुले आणि मुली, 18 ते 30, 31 ते 40, 41 ते 50 आणि 51+ पुरुष आणि महिला गटात होणार्‍या या स्पर्धेतील सहभाग किटमध्ये टी-शर्ट, नाश्ता, टायमिंग चिप, पदक, प्रमाणपत्र आणि विजेत्यांसाठी ट्रॉफी देण्यात येणार आहे. इच्छुकांनी https://www.townscript.com/e/chhaba-foundation-trust-kamothe-run-443004 या लिंकद्वारे ऑनलाईन नोंदणी करावी. ऑफलाईन नोंदणी व अधिक माहितीसाठी छाबा फाऊंडेशन ट्रस्टशी 9619452447, 8369611206 या क्रमांकांवर संपर्क करावा, असे आवाहन अध्यक्ष दामोदर चव्हाण, उपाध्यक्ष सचिन तांबोळी, खजिनदार शेखर जगताप यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply