Breaking News

खंडाळा घाटामध्ये पाणपोई; आईच्या स्मरणार्थ खोपोलीतील ऋषभ शेळके यांचा उपक्रम

खालापूर : प्रतिनिधी

कोकण दिंडीच्या माध्यमातून पायी दिंडीने निघालेल्या वारकर्‍यांना पिण्याच्या पाण्याची मोफत सोय व्हावी, या हेतूने वरची खोपली येथील सामजिक कार्यकर्ते ऋषभ शेळके यांनी त्यांच्या मातोश्री कै. दिपाली दिलीप शेळके यांच्या स्मरणार्थ खंडाळा घाटात पाणपोईची सेवा सुरू केली आहे. या उपक्रमाचा नुकताच शेळके कुटुंबीय आणि मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. कोकण दिंडीच्या माध्यमातून शेकडो वारकरी दरवर्षी आषाढी, कार्तिकी एकादशीला व अन्य वेळी खंडाळा घाटातून पायी प्रवास करीत असतात. त्यांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, म्हणून सामजिक कार्यकर्ते ऋषभ शेळके यांच्या प्रयत्नातून मातोश्री कै. दिपाली दिलीप शेळके यांच्या स्मरणार्थ खंडाळा घाटात मोफत पाणपोई सेवा सुरू करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते मंगेश काळोखे, सागर मोरे, संतोष ठाकोळ यांच्यासह वरची खोपोलीतील मित्रमंडळी आणि शेळके कुटुंबीय यांच्या उपस्थितीत या पाणपोई उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या समाजोपयोगी सेवेबद्दल शेळके कुटुंबियांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Check Also

कामोठ्यात शनिवारी ’मा. श्री. परेश ठाकूर केसरी’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने

पैलवान देवा थापा आणि नवीन चौहान यांची बिग शो मॅच होणार पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply