Breaking News

जनतेचा विकास हेच माझे ध्येय -आमदार रविशेठ पाटील

पेण : प्रतिनिधी

रस्त्याबरोबर अनेक विकासकामांचे कामेसुद्धा होणार आहेत. मी कधीही राजकारण केले नाही पेण तालुक्याचा विकास हेच माझे ध्येय असल्यामुळे पेण तालुक्यात मी भरभरून आमदार निधी देऊन गावांचा विकास करण्याचे ध्येय ठेवले आहे, असे प्रतिपादन आमदार रविशेठ पाटील यांनी केले. पेणमध्ये विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण झाले. त्या वेळी ते बोलत होते. पेण तालुक्यातील खरोशी येथील राष्ट्रीय महामार्ग ते खरोशी गाव मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजुर झालेल्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे उद्घाटन, केळंबादेवी मंदीराजवळील सभामंडपाचे लोकार्पण, खरोशी धरणवाडी साकवाचे लोकार्पण, खरोशी गावातील अंतर्गतरस्त्याचे भूमिपूजन, असे एकुण एक कोटी आठ लाखांच्या विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण आमदार रविशेठ पाटील यांचे हस्ते करण्यात आले. यात खरोशी फाटा ते खरोशी गाव रस्ता डांबरीकरणाचा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेद्वारे 93 लाख खर्चातून होणार आहे.  या वेळी भाजपचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, भाजप तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील, पं. स. सदस्य मालती म्हात्रे, पुजा घरत, वासुदेव म्हात्रे, भाजप तालुका उपाध्यक्ष महेश घरत, अनंता पाटील, गंगाराम पाटील, सविता पाटील आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. येथील शेतकरी भाजीपाला पिकवणारे शेतकरी आहेत. त्यांच्या भाजीपाला वाहतुकीचा प्रश्न येथील साकवच्या बांधकामामुळे सुटणार आहे. येथील विजेचा प्रश्न सोडविला आहे. येथील शेतकरी भाजीपाला पिकवत असुन येथील नदीवर बंधारा बांधण्यासाठी प्रयत्न करणार आहे, तर या गावातील विकास कामासाठी अतिरिक्त निधी देणार असल्याचे आमदार रविशेठ पाटील यांनी या वेळी सांगितले.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply