Breaking News

रसायनयुक्त सांडपाणी वाहिनी फुटली; शिरगाव ग्रामस्थ आक्रमक

महाड : प्रतिनिधी  

महाड एमआयडीसीमधून रासायनिक सांडपाणी वाहून नेणारी पाइपलाइन वडवली गावाजवळ सोमवारी (दि. 14) सायंकाळी सातच्या सुमारास फुटली. त्यामुळे परिसरातील अनेक शेतांमध्ये रसायनयुक्त सांडपाणी गेल्याने शेतकरी आक्रमक झाले. शिरगाव ग्रामस्थांनी यावेळी महाड औद्योगिक विकास महामंडळाच्या कारभारावर संताप व्यक्त केला. महाड औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कंपन्यांचे सांडपाणी सामाईक सांडपाणी प्रक्रिया केंद्रात प्रक्रिया करून पाइपलाइनद्वारे खाडीत सोडले जाते. ही पाइपलाइन राजेवाडी, वडवली, कोल, शिरगावमार्गे खाडीपट्ट्यात जाते. या पुर्वी अनेकवेळा ही पाइपलाइन फुटून शेतकर्‍यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे. सोमवारी संध्याकाळी शिरगाव आणि वडवली गावांच्याजवळ ही पाइपलाइन पुन्हा फुटली. हजारो लिटर रासानिक सांडपाणी परिसरातील अनेक शेतांत पसरले. त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले अ ाहे. रासायनिक सांडपाण्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. सुमारे तीन तास हे सांडपाणी वाहत असतानादेखील एमआयडीसीचे कोणताही कर्मचारी घटनास्थळी लवकर पोहोचले नाहीत. यामुळे शेतकर्‍यांनी संताप व्यक्त केला. संपूर्ण शिरगाव गाव या वेळी रस्त्याला आले होते. रासायनिक सांडपाणी वाहून नेणारी पाइपलाइन फुटण्याची ही पहिलीच घटना नसून यापूर्वीदेखील अनेक वेळा ही रासायनिक सांडपाणी वाहिनी फुटण्याच्या घटना घडल्या आहेत, मात्र त्याकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ व एमआयडीसीचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप या वेळी ग्रामस्थांनी केला.

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply