Breaking News

ई-श्रम आणि युनिव्हर्सल कार्ड शिबिर

नवी मुंबई : प्रतिनिधी

नवी मुंबईतील प्रभाग क्र.34 भाजप अध्यक्ष अ‍ॅड. गणेश रसाळ यांच्या वतीने मोफत ई-श्रम कार्ड आणि रेल्वे प्रवासाकरिता युनिव्हर्सल कार्ड काढून देण्याचे शिबिर रविवारी (दि. 6) आयोजित करण्यात आले होते.

नेरूळ सेक्टर-8 येथील भाजप कार्यालयात झालेल्या या शिबिराचा लाभ सुमारे 400 गरजूंनी घेतला. या वेळी माजी महापौर सागर नाईक, युवा नेते सुरज पाटील, अक्षय पाटील  यांनी शिबिराला भेट देऊन कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केले.

भाऊ ठाकूर, हेमंत पोमन, नारायण धोंडे, सुधीर वाघमारे, भिका कदम, लक्ष्मण सणस, राजेश बोरले, निखील नेटके आदी कार्यकर्त्यांनी या वेळी मेहनत घेतली.

Check Also

तळोजा मजकूरमध्ये शिवरायांच्या मंदिराचा वर्धापन दिन

तळोजा : रामप्रहर वृत्ततळोजा मजकूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचा पहिला वर्धापन दिन रविवारी …

Leave a Reply