Breaking News

सह्याद्रि प्रतिष्ठानतर्फे द्रोणागिरी किल्ल्यावर साफसफाई

उरण ः रामप्रहर वृत्त – छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांचे विचार व कार्याचा प्रसार व प्रचार करणार्‍या सह्याद्रि प्रतिष्ठान उरण तालुक्याच्या वतीने उरण तालुक्यातील उरणचे वैभव असलेल्या द्रोणागिरी किल्ल्यावर दुर्गसंवर्धन मोहिमेअंतर्गत साफसफाई करून विविध वृक्षे लावण्यात आली.

सह्याद्रि प्रतिष्ठानतर्फे राज्यातील गड किल्ल्यांचे संवर्धन, संरक्षणाचे काम मोठ्या प्रमाणात चालू असून त्याच्याच एक भाग म्हणून दुर्गसंवर्धन मोहिमेअंतर्गत उरण तालुक्यातील द्रोणागिरी या ऐतिहासिक किल्ल्यावर साफसफाई करून विविध वृक्षे लावण्यात आली.

यावेळी सह्याद्रि प्रतिष्ठानचे अभिषेक ठाकूर, अलंकार ठाकूर, हितेश पाटील, प्रशांत भोईर, प्रतीक परदेशी, अभिजीत घरत, मयुर कोळी, संकेत ठाकूर, चेतन पाटील, थिंक डिफरंट संघटनेचे चेतन विशे, अमोल दुरुगकर, आर्यन घरत, ठाणे जिल्ह्यातून आलेले संगीता जाधव, अथर्व जाधव, प्रेमा आगवणे, सायन(मुंबई), विल्सन (वरळी), सह्याद्रि प्रतिष्ठानचे प्रसिद्धि प्रमुख विट्ठल ममताबादे आदींनी यात सहभाग घेतला.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply