Breaking News

ज्युडो स्पर्धेत ‘सीकेटी’तील विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

पनवेल ः रामप्रहर वृत्त

क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयांतर्गत नुकत्याच झालेल्या पनवेल महानगरपालिका जिल्हास्तरीय शालेय ज्युडो स्पर्धेत नवीन पनवेल येथील चांगु काना ठाकूर (सीकेटी) उच्च माध्यमिक विद्यालयातील अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली. यामध्ये सादिका मंसुरी प्रथम क्रमांक, विघ्नेश सारंग प्रथम क्रमांक, रोहित यादव प्रथम क्रमांक, आर्यन स्वेन प्रथम क्रमांक, अतुल पासवान प्रथम क्रमांक पटकावला. सर्व विद्यार्थ्यांची मुंबई विभागीय शालेय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यशस्वी क्रीडा स्पर्धकांचे संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे, सहसचिव भाऊसाहेब थोरात, पर्यवेक्षक अजित सोनवणे, प्रशांत मोरे, क्रीडा शिक्षक अरुण पाटील, माधवी कोळी, मनोज पाटील तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Check Also

खोपोलीत 106 कोटींचे ड्रग्ज जप्त

पोलिसांची कंपनीत कारवाई, त्रिकूट ताब्यात खोपोली, खालापूर : प्रतिनिधी खोपोली पोलिसांनी ढेकू गावच्या हद्दीतील एका …

Leave a Reply