Breaking News

भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते बंडूशेठ गोंधळी यांचे निधन

पनवेल ः रामप्रहर वृत्त

भारतीय जनता पक्षाचे पनवेल तालुक्यातील खेरणे येथील ज्येष्ठ कार्यकर्ते बंडूशेठ उंदीर गोंधळी (अण्णा) यांचे रविवारी (दि. 11) रात्री 1च्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. ते 80 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. बंडूशेठ गोंधळी यांच्यावर खेरणे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, शिवसेना जिल्हा सल्लागार बबन पाटील, रामदास पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील लोक, ग्रामस्थ उपस्थित होते. बंडूशेठ यांच्या रूपाने एक चांगला कार्यकर्ता गमावल्याची भावना या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केली, तर बबन पाटील यांनी बंडूशेठ यांच्याशी कौटुंबिक संबंध होते. ते उत्तम मार्गदर्शक होते, असे सांगितले. कै. बंडूशेठ यांचा दशक्रिया विधी 20 एप्रिल रोजी, तर उत्तरकार्य 24 एप्रिल रोजी खेरणे येथे होणार आहे.

Check Also

महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आमूलाग्र बदलांचे संकेत

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याला मोठे यश! संपूर्ण महाराष्ट्रातील रुग्णांना होणार फायदा मुंबई : रामप्रहर …

Leave a Reply